*💫कणकवली दि.०३-:* जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, गौरीशंकर खोत, शाखाप्रमुख राजा म्हसकर, संदेश पटेल, सोसायटी चेअरमन रवी तेली, अतुल सदडेकर, महाडेश्वर, तात्या निकम, आबु मेस्त्री, इमाम नावलेकर, डॉ. दीक्षा वाळके व आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान
