*💫सावंतवाडी दि.०७-:* केंद्र सरकारने भारतातील शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत असून, केंद्र सरकारने केलेले तीन कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकरी संघटनेकडून उद्या भारत बंद पुकारण्यात आले आहे. या बंद ला राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा सह बहुजन मुक्ती पार्टी यांनी समर्थन दिले आहे. याबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देत हे कायदे रद्द करावेत अशी मागणी केली आहे. तसेच यावर योग्य कार्यवाही न झाल्यास देशभरात उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला बहुजन मुक्ती पार्टीचे समर्थन
