गोवा बनावटीची दारू अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी सुकळवाड येथील एकास अटक

*ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली कारवाई

मालवण (प्रतिनिधी) ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मालवण तालुक्यातील सुकळवाड वायंगणकरवाडी येथील जंगलमय भागात टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी प्रल्हाद अर्जुन वायंगणकर (वय-५५) याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातील ९ हजार २०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान हातातील पिशवीतून दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या प्रल्हाद वायंगणकर याला गुन्हा अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. देसाई, ज्ञानेश्वर कांदळगावकर, ए. ए. गंगावणे, के. ए. केसरकर, आर. एम. इंगळे, पी. पी. गावडे, पी. एस. नाईक यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडील ९ हजार २०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत मालवण पोलीस स्थानकात प्रल्हाद वायंगणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट्टा दुरक्षेत्राचे रुक्मांगद मुंडे तपास करत आहेत.

You cannot copy content of this page