सावंतवाडी रक्तपेढीमध्ये तातडीने रक्त साठवणुक करुन ठेवण्याच्या बॅग्स द्या

सात दिवसांत न दिल्यास भीक स्वरुपात युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देण्यात येईल

*💫सावंतवाडी दि.०२-* उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकमध्ये असणाऱ्या कमतरतांबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील यांच लक्ष वेधल. उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त स्टोअर करण्यात येणाऱ्या ‘ब्लड बॅग्सची’ कमतरता असल्याने रक्तदान शिबीरे घेण्यास अडचणी येत आहेत. कोव्हीड काळात रक्ताची आवश्यकता असताना या बॅग्स अत्यावश्यक आहे. तर ब्लड स्टोअर वातानुकूलित रूममधील एसी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवल्या जात असून उंदीर मशीनरीची, सामानाची नासधूस करत आहेत. त्याच बरोबर महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाट याठिकाणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे येत्या ७ दिवसांत हे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी त्यांनी केली. तर रक्तपेढीतील गैरसोय तातडीनं दुर व्हावी, अन्यथा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या वस्तू भीक स्वरुपात देऊन अनोख्या पद्धतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांनी दिला. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे वसंत सावंत, राघवेंद्र चितारी , पार्थिल माठेकर, डॉ. मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page