*💫कणकवली दि.०७-:* कोकण रेल्वे मार्गा वरुन धावणाऱ्या गांधीधाम – तिरुनवेली – गांधीधाम व जामनगर – तिरुनवेली – जामनगर या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे . या दोन्ही गाड्यांचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे . गाड्यांना रत्नागिरी स्थानकात थांबा आहे . तिरुनवेली (०९४२४) साप्ताहीक गाडी ७ ते २८ डिसेंबर या कालावधीत दर सोमवारी पहाटे ४.४० वाजता गांधीधाम येथून सुटेल . तेथून रात्री ९.३५ वाजता रत्नागिरी व दुसऱ्या दिवशी रात्री ११.३५ वाजता तिरुनवेली येथे पोहोचेल . तिरुनवेली – गांधीधाम ( ०९४२३) ही गांधीधाम गाडी १० ते ३१ डिसेंबर या कालावधीत दर गुरुवारी सकाळी ७.४० वाजता तिरुनवेली येवून सुटेल . तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता रत्नागिरी व तिसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता गांधीधाम येथे पोहोचेल. त्याशिवाय गाडीला अहमदाबाद , बडोदरा , सुरत , वसई , पनवेल , मडगांव , कारवार , मंगलुरू आदी स्थानकांवर थांबा आहे . जामनगर तिरुनवेली ( ०९५७८ ) ही गाडी दर शुक्रवारी , शनिवारी रात्री ९ .२० वाजता जामनगर येथून सुटेल . तेथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.२५ वाजता रत्नागिरी व तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ .२० वाजता तिरुनवेली येथे पोहोचेल . तिरुनवेली जामनगर ( ०९५७७ ) ही गाडी दर सोमवार , मंगळवारी सकाळी ७.४० वाजता तिरुनवेली येथून सुटेल . तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता रत्नागिरी व तिसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता जामनगर येथे पोहोचेल . त्याशिवाय गाडीला राजकोट , सुरेंद्रनगर अहमदाबाद , बडोदरा , सुरत , बोईसर , वसई , पनवेल , मडगांव , कारवार , उडपी , मंगलुरू आदी स्थानकांवर थांबा आहे , अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे .
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या त्या दोन रेल्वे गाड्यांना मुदतवाढ…
