कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कामाची खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

*💫कुडाळ दि.०७-:* कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून आज खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वालावलकर व ठेकेदार यांच्याशी चर्चा करत उर्वरित काम वेळेत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी जि. प. सदस्य राजू कविटकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे,युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हा समन्वय सुशील चिंदरकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, कृष्णा धुरी, संजय भोगटे, राजू गवंडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page