प्रत्येक लाभार्थीला मानधन दुप्पट करण्याचा बैठकीत ठराव –
*💫वैभववाडी दि.०७-:* संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती वैभववाडीची बैठक संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मंगेश लोके यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे नुकतीच पार पडली.यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना 13,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 7 व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना 2 अशा 22 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. शासना मार्फत सध्या लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये अनुदान दिले जात आहे.शासनाने दर महा 2 हजार रुपये इतके मानधन प्रत्येक लाभार्थ्यांना करावे,असा ठराव अध्यक्ष मंगेश लोके यांनी बैठकीत मांडला. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सचिव तहसीलदार वैभववाडी रामदास झळके,निवासी नायब तहसिलदार अशोक नाईक, मुख्याधिकारी नगरपंचायत, सदस्य रवींद्र पवार, सारिका सुतार ,सुरेश पांचाळ, शंकर कोकरे, स्वप्नील धुरी,श्रीकृष्ण साईल ,राजेश तावडे, संकेत सावंत, भालचंद्र जाधव,गटविकास अधिकारी, नगर पंचायत समितीचे मुख्याधिकारी आदी सदस्य उपस्थित होते.