सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७.-:* शासनाकडून आलेला प्रशिक्षण कार्यक्रम वेळीच व योग्य प्रकारे न राबविल्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित ठेवून आर्थिक नुकसान करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी .या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले . सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजाचा कसा फटका बसला आणि आर्थिक नुकसान कसे झाले. याबाबत शासनाचे व जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, भानू तळगावकर ,सोनू नाईक, यांनी आज जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे या आंदोलनातून त्यांनी लक्ष वेधताना शासनाकडून आलेला प्रशिक्षण कार्यक्रम वेळीच व योग्य प्रकारे न राबविल्यामुळे निवड श्रेणीच्या लाभापासून शिक्षकाना वंचित राहावे लागले आहे याकडे लक्ष वेधले. तर सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतर सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांची निवड श्रेणी बाबतची अट पूर्ण करून घेणारे संबंधित अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर प्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापने कडून बेकायदेशीर रित्या कार्यमुक्त करणारे व सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या स्थापनेकडे हजर करून घेणारे अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर च्या दिनांकाला प्राप्त करण्यात आलेल्या अर्हताची मूळ सेवा पुस्तकात बेकायदेशीर पणे नोंदी करणारे अधिकारी, निवृत्तीनंतरच्या प्रशिक्षणाची नोंद घेऊन त्यांचे निवड श्रेणी साठी चे प्रस्ताव पाठवणारे अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाची नोंद करून व त्यांचे प्रशिक्षणच झाले नाही अशा शिक्षकांच्या प्रशिक्षण झाल्या बाबतच्या खोट्या तारखा नोंदवून टिपणी करणारे व त्या टिप्पणीवर शिफारस करून स्वाक्षरी करणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी, निवड श्रेणी मंजुरीच्या आदेशानंतर त्यात झालेल्या गंभीर चुका लेखी निदर्शनात आणून देऊन सुद्धा त्या आदेशाला स्थगिती न देणारे अधिकारी-कर्मचारी, आक्षेपा नंतर निवडश्रेणी वेतन निश्चिती पडताळणी थांबवणारे व पुन्हा कशाचीही शहानिशा न करता मंजुरी देणारे अधिकारी, निवड श्रेणी लाभासाठी निवृत्तीनंतर सेवांतर्गत प्रशिक्षण कसे झाले याबाबत आक्षेप न काढता ते बेकायदेशीररित्या ग्राह्य धरून लाभ मंजूर करणारे अधिकारी, निवृत्तीनंतरच्या प्रशिक्षणाची सेवा पुस्तकात नोंद करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांची चौकशी करण्याबाबतचे आदेश देणारे व त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही . त्याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी .अशी मागणी निवेदनातून केली आहे या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आज एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.

You cannot copy content of this page