संस्थांनी विद्यार्थ्यांची परीक्षाफीआठी लुबाडणूक वेळीच थांबवावी, अन्यथा आंदोलन

*युवासेना शहर अधिकारी सुयोग चेंदवणकर यांनी दिला इशारा

*💫वेंगुर्ला दि.०७-:* माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद असताना काही संस्था व संस्थाचालक विद्यार्थी व पालकांना शाळा, कॉलेज प्रवेश फी तसेच परीक्षा फीसाठी तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांची अशा संस्थांनी लुबाडणूक वेळीच थांबवावी, अन्यथा युवासेनेच्या माध्यमातून या संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना शहर अधिकारी सुयोग चेंदवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात चेंदवणकर म्हणाले, कोरोना काळामध्ये शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असून या महामारीच्या आपत्ती काळामध्ये सर्वसामान्य जनतेचे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक लोकांना लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या कामकाजावर परिणाम झाला असताना काही पाल्यांना खाजगी शिकवणीचा आधार घ्यावा लागला आणि त्यातुनच पालकांनाही अतिरिक्त भुर्दंड पडला. अशा परिस्थितीत शाळा बंद असताना काही संस्था व संस्थाचालक विद्यार्थी व पालकांना शाळा, कॉलेज प्रवेश फी, परीक्षा फीसाठी तगादा लावत आहेत. अशा परिस्थितीत काही पाल्यांचे पालक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. अशा पाल्यांची कॉलेज फी व परीक्षा फी भरण्याची कुवत नाही. या विद्यार्थ्यांची अशा संस्थांनी लुबाडणूक वेळीच थांबवावी व त्यांना मुभा द्यावी, अन्यथा युवासेनेच्या माध्यमातून या संस्थाचालकांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा चेंदवणकर यांनी दिला. तसेच याबाबत शाळा कॉलेजांच्या प्रवेशासाठी कुणावरही अन्याय झाल्यास युवासेना शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही सुयोग चेंदवणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page