मच्छीमार्केट नजीकच्या सार्वजनिक विहिरीची अँड. परिमल नाईक यांनी केली पाहणी

विहिरीचे सर्वेक्षण करून आवश्यक असेल तिथे डागडुजी व निर्जंतुकीकरण करण्याची हमी

सावंतवाडी : सावंतवाडी मच्छीमार्केट नजीकच्या सार्वजनिक विहिरीची पाहणी अँड. परिमल नाईक यांनी केली. सार्वजनिक विहिरीचे सर्वेक्षण करून आवश्यक असेल तिथे डागडुजी व निर्जंतुकीकरण करून पाण्याचा विनियोग करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, आरोग्य अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते. नाईक म्हणाले, शहरातील सार्वजनिक विहिरीचे सर्वेक्षण करून आवश्यक असेल तिथे डागडुजी व निर्जंतुकीकरण करून पाण्याचा विनियोग करणार जेणेकरून पाणी टंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल. शहारात प्राप्त परस्थितीत मुबलक पाणी असलेल्या सार्वजनिक विहिरी उपलब्ध आहेत. परंतु त्या अनेक वर्ष वापरात नसल्याने अडगळीत पडल्या आहेत व त्या सुस्थित ठेवण्याचा प्रयत्न नगरपरिषद माध्यमातून करणार आहोत. याबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page