सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांचे वनविभाग कार्यालयासमोर उपोषण सुरु
*💫सावंतवाडी दि.२३-:* माणगाव बदली पास घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या वनपालावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्याकडून माणगाव वनपाल पदाचा कार्यभार काढून घेण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सावंतवाडी वनविभाग विभागीय कार्यालय समोर आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी आपणाला न्याय मिळेपर्यंत आपण येथून उठणार नाही. असा इशारा दिला आहे.
