काहींचा विरोध तर काहींची सहमती
*💫कणकवली दि.२३-:* कोरोना संक्रमण वाढत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला डेल्टाप्लसचा रुग्ण कणकवली शहरात परबवाडी येथे मिळालेला रुग्णामुळे कणकवली शहरातही खळबळ उडाली.दरम्यान ज्या इमारतीमध्ये डेल्टा प्लसचा रुग्ण आहे त्या इमारतीमधील व आजूबाजूच्या इमारतीमधील स्वॅब टेस्ट करण्यासाठी आरोग्य पथक दाखल झाल्यानंतर काही नागरिकांनी विरोध केला तर काहींनी सहमती दर्शविल्यानंतर स्वॅब टेस्ट करण्यास सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे,नगरसेवक संजय कामतेकर यांनी उपस्थित राहत समस्या जाणून घेतल्या. कणकवली परबवाडीत ज्या इमारतीमध्ये डेल्टा प्लसचा रुग्ण आहे त्या इमारतीमधील व आजूबाजूच्या इमारतीमधील स्वॅब टेस्ट घेण्यासाठी आज कणकवली तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी व नगरपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन दाखल झाले. यावेळी काही रहिवाशांनी स्वॅब देण्यासाठी नकार दिला. एवढे दिवस आपण त्या डेल्टारुग्णाला होमकॉरनटाईन का केले नाही? पहिलीच आपण का काळजी घेतली नाही? आता आमची स्वॅब घेऊन आम्हाला नाहक त्रास का सहन करावा लावताय? असे सवाल उपस्थित केले सांगितले. तर काही रहिवाशांनी स्वॅब देण्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याने स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कणकवली तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ, डॉ.संतोष चौगुले, रहिवासी डॉ.चंद्रकांत पुरळकर,रमेश झेमणे ,अशोकआचरेकर,प्रवीण सावंत,दीक्षा पुरळकर, उपस्थित होते
