Headlines

आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते सन्मान

*💫कणकवली दि.२३-:* राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र, लाईव्ह संवाद व निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी श्री. बुचडे यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल पालक मंत्री यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, संदेश पारकर, राजू राठोड व इतर उपस्थित होते. कोरोना कालावधीत श्री. बुचडे यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय युद्धा पुरस्कार जाहीर झाला होता. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page