धडाकेबाज, हुशार आणि शब्दाला जागणारे आमदार म्हणजे “नितेश राणे”

माजी मुख्यमंत्री नारायण राणें प्रमाणे दमदार वृत्ती असलेले कार्यसम्राट युवा आमदार

*💫सावंतवाडी दि.२३-:* जे बोलणार ते करून दाखवणार अशी दमदार वृत्ती असलेले सिंधुदुर्गातील कार्य सम्राट आमदार म्हणजे नितेशजी राणे. आमदार नितेश राणे यांचे नाव जरी ऐकले तरी आठवण येते ती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या धडाकेबाज कामाची, त्यांच्या हुशारीची आणि दिलेल्या वचनाला जगण्याच्या त्यांच्या वृत्तीची. आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ने घेतलेला हा धावता आढावा… गोरगरिबांच्या मदतीला धाऊन जाणारा, दयाळू, निर्णयक्षमता असलेला, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून समस्या तडीस नेणारा असा हा युवा वर्गाच्या गळ्यातील ताईत बनलेला हक्काचा माणूस म्हणजे नितेश राणे. अल्पावधीतच सिंधुदुर्गासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याच्या जोरावर नितेश राणे लोकप्रिय झाले आहेत. कोणतेही काम स्वतःला झोकून देऊन करण्याची पद्धतच त्यांना नेहमी यश देऊन जाते. माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असली की माणूस सहज यशाला गवसणी घालू शकतो. अगदी तशीच प्रबळ इच्छाशक्ती नितेश राणे यांची आहे. नितेश राणे यांच्यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीच झलक दिसते. तरुणपणीचे नारायण राणे आणि त्यांचा कामाचा धडाका किंबहुना थोडा जास्तच नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येतो. वैभववाडी, देवगड सारख्या जिल्ह्यातील दुर्लक्षित राहिलेल्या तालुक्यात आज नितेश राणे यांनी आमदार झाल्यावर आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने त्या तालुक्यांना सक्षम केले आहे. तसेच शिक्षण, क्रीडा, पर्यटन, रोजगार या क्षेत्रात नितेश राणे यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यानी आपल्या मतदारसंघातील १५० शाळा डिजिटल करून शिक्षण क्षेत्रात न भूतो न भविष्यती असे काम केले आहे. नितेश राणे जे बोलतात ते तडीस नेतात. मच्छीमारांची समस्या सोडविण्यासाठी समुद्र किनाऱ्यापासून मंत्रालयापर्यंत ते नेहमी धाव घेतात. कोणाच्याही काहीही समस्या असोत, त्या सोडविण्यासाठी सदैव कार्यरत राहणारा हा हक्काचा माणूस सिंधुदुर्गापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला आहे. पाणी समस्या असलेल्या गावात सरकारी मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून त्यांनी बोअरवेल खोदून दिलेल्या आहेत. गणपतीत मुंबईहून गावी येणाऱ्या गोरगरीब चाकरमान्यांला १०० रुपयात गावी आणणे असो वा वृद्धांना पंढरपूर तसेच इतर प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांचे दर्शन घडवणे असो नितेश राणे दरवर्षी असे उपक्रम राबवित असतात. कोकणातील महामार्गाचे काम असो वा लोकांची नुकसानभरपाई, ते नेहमीच लोकांच्या बाजूने उभे राहत त्यांचे प्रश्न सोडवतात. त्यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून काम सुरू करून अनेक लोकांच्या समस्या सोडविल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिभावान धडाकेबाज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा युवा नेता आपल्या कामांच्या जोरावर घराघरात पोचला आहे. अंगावर आलेल्याना शिंगावर घेण्याची धमक त्यांच्यात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील सरपंचांवर कोविड कक्ष गावागावात उभारण्याची जबाबदारी सोपवली तेव्हा सरपंचांना सर्वप्रथम विमा कवच स्वतःच्या खर्चातून देण्यासाठी ते पुढे आले. जिल्ह्यात कोणतीही समस्या उद्भवल्यास नितेश राणे तिथे सर्वप्रथम पोचतात. सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहून आपल्या समाजाभिमुख कार्याने जिल्हावासीयांची मने जिंकणाऱ्या युवा आमदार नितेश राणेना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

You cannot copy content of this page