मालवण दि प्रतिनिधी चौके स्थळकरवाडी येथील युवक सचिन रमाकांत गावडे (३८ ) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात दुःखद निधन झाले. सचिन गावडे हा चौके पंचक्रोशीसह तालुक्यात आप्पा गावडे या नावाने ओळखला जायचा. सुरवातीला रिक्षा व्यवसाय नंतर युवा व्यावसायीक अशी आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आप्पाचा तालुक्यात मोठा मित्रपरिवार होता. चौके येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक रमाकांत गावडे यांचा मुलगा तर चौके सरपंच राजन गावडे यांचा भाऊ होता. मालवण येथील बाबा परब मित्रमंडळाचा सच्चा शिलेदार होता. सचिन गावडे पश्च्यात आई वडील, पत्नी लहान मुलगा, काका भाऊ असा परिवार आहे. आप्पाच्या निधनाची वार्ता समजताच चौके पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
चौके येथील सचिन (आप्पा) गावडे या तरुणाचे निधन
