*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात माठेवाडा १, खासकील वाडा ८, भटवाडी १, बिरोडकरटेंब १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात दाणोली १, बांदा २, आरोंदा १, किनळे १, सोनुर्ली ६, माजगाव ९, ओटवणे १, कोलगाव ३, कुणकेरी ३, सांगेली १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ४७९ रुग्ण सक्रिय आहेत.
