सेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांचे नागरिकांना आवाहन
*💫सावंतवाडी दि.२१-:* बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी देखील सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे. या सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले आहे. तसेच शिवसेना गोरगरीब जनतेच्या पाठीशी नेहमी उभी राहते. त्याप्रमाणे यापुढेही कायम उभी राहिल असे आश्वासन देखील कुडतरकर यांनी दिले आहे.
