गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी चारही आरोपींना सशर्त जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.१९-:* बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोशन पाल, ओमप्रकाश पाल, दिलीप रावत आणि रुपेश सोने या चारही आरोपी पैकी ओमप्रकाश पाल याला सावंतवाडी न्यायलयाने १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर उर्वरित तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायलयाने प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुन रोजी गोव्याहून नागपूरला जाणाऱ्या दहा चाकी ट्रकवर इन्सुली नाका येथे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीची दारुसह एकूण ८० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यावेळी चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना ४ जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर ४ जुन रोजी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी अँड परशुराम चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर ओमप्रकाश पाल यांना १५ हजाराचा जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला होता. तर इतर तिन्ही आरोपींचे जमीन अर्ज नामंजूर केले होते. त्यानंतर सबंधित तिन्ही आरोपींना जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावेळी जिल्हा न्यायलयाने प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले होते.

You cannot copy content of this page