*भाजप मंडल अध्यक्ष विनायक राणे यांची कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
*💫कुडाळ दि.१९-:* सरकारी कामात अडथळा व कोरोना संक्रमण वाढविण्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुडाळ भाजप मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात राणे यांनी म्हटले की, कुडाळ-मालवणचे विद्यमान आमदार वैभव नाईक, संजय पडते, राजन नाईक, नागेंद्र परब, जान्हवी सावंत, संतोष शिरसाट, राजू जांभेकर, विकास कुडाळकर, मंदार कोठावळे, गोट्या चव्हाण, राजू गवंडे व इतर ५० ते ६० शिवसेना कार्यकर्त्यांनी राज्यामध्ये कोरोना संक्रमण असताना भारत पेट्रोल पंपासमोर जमाव करून आंदोलन केले. त्यामुळे कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झालेले आहे. आंदोलनावेळी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना धक्काबुक्कीही केली. त्यामुळे वैभव नाईक व इतर सहकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा व कोरोना संक्रमण वाढविण्याबाबत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राणे यांनी केली.
