*💫सावंतवाडी दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न- विश्वरत्न महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे ठीक १२:०० वाजता त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी समाज मंदिर येथील प्रवीण कांबळे, प्रदीप कांबळे, अभिजित जाधव, चेतन आसोलकर, हेमंत कांबळे, सागर कोटेकर, किरण कांबळे, रुपेश जाधव, प्रकाश वाडकर, सुरेश कांबळे, अमर जाधव, अरविंद जाधव, सुरेश खोब्रागडे तसेच परिसरातील नागरिक आणि शहरातील समाज बांधव उपस्थित होते.
६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाहण्यात आली आदरांजली
