*💫सावंतवाडी दि.०५-:* शहरातील डॉ. मिलिंद खानोलकर यांचे आंबोली येथील घर बेकायदेशीर रित्या जमीनदोस्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी पैकी दिलीप गावडे, लक्ष्मण गावडे, मनोहर गावडे, प्रथमेश गावडे या चार संशयित आरोपींचा अटक पूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी नामंजूर केला आहे. याकामी सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.
बेकायदेशीररित्या घर जमीन दोस्त केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला
