जुनी पेंशन योजना व इतर मागण्यांसंदर्भात केले निवेदन सादर
*💫आंबोली दि.०५-:* आंबोली येथे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने भेट घेण्यात आली. यावेळी शिक्षक संघाच्यावतीने जुनी पेंशन योजना आणि इतर मागण्यांसंदर्भात मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य संयुक्त सरचिटणीस म. ल. देसाई, पु. ल. शेणई, बाबाजी झेंडे, आंबोली केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, संजय शेडगे, अनंत राऊत, मोहन पाटील, प्रसाद गावडे, मधु कोले, महेश सावंत, विजय गावडे, बाबा गुरुजी आदी उपस्थित होते.