भाजपच्या पिछेहाटीचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

शिक्षक पदवीधर निवडणुकीचा कुडाळ मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा केला आनंदोत्सव

*💫कुडाळ दि.०५-:* राज्यात झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अपयशामुळे कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. शिक्षक पदवीधर संघाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात ही भाजप उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख अमित सामंत, संघटक काका कुडाळकर, उपजिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा सचिव शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, माजी तालुका प्रमुख संतोष शिरसाट, माजी प. स. सदस्य अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, युवक काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक काँग्रेस कुडाळ शहर अध्यक्ष चिन्मय बांदेकर, युवक काँग्रेस कुडाळ तालुका अध्यक्ष म्हाडदळकर, सुंदर सावंत, उल्हास शिरसाट, तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page