एस. टी बसमधील प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मालवण – कुडाळ एस टी बसमधील घटना

*💫कुडाळ दि.०५-:* मालवणहुन कुडाळला एसटी बसने येणारे प्रवासी राजू मालवणकर ( ५९, रा. मुंबई) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रवासातच निधन झाले. ही घटना आज सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले राजू मालवणकर यांचे मालवण मेढा येथे घर आहे. सध्या त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने ते व त्याचे भाऊ मुंबईहून मालवणला काही दिवसांपूर्वी आले होते. शनिवारी सायंकाळी कुडाळ रेल्वेस्टेशनवरून कोकण कन्या एक्सप्रेस ने मुंबईला मालवणकर, त्यांचे भाऊ व त्यांचा मुंबई येथील मित्र जाणार होते. त्यासाठी शनिवारी सायंकाळी मालवण कुडाळ एसटी बसने धामापूरमार्गे कुडाळ येत होते.।या दरम्यान धामापुर जवळ आले असता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटु लागले. या बसमध्ये असलेल्या ओरोस येथील नर्स मानसी चव्हाण यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना बरे करण्याचे खूप प्रयत्न केले. या दरम्यान चालकानेही एसटी बस तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात नेली. लगेचच मालवणकर यांना कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासले असता उपचारा अगोदरच त्यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले. राजू मालवणकर हे मालवण येथील असुन मुंबई बोरीवली येथे बँकेत कामाला होते

You cannot copy content of this page