आचरा,चिंदर येथील ग्राम विलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

*💫मालवण दि.१७-:* आचरा व चिंदर येथील ग्राम विलगीकरण कक्षाला आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन पाहणी केली. ग्राम विलगीकरण कक्षामध्ये कोविड रुग्णांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा त्यांनी घेतला. व आवश्यक सूचना केल्या. त्याचप्रमाणे चिंदर येथील अरुण राणे, रॉबिन फर्नांडिस, धकू कांबळी यांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर,भाऊ परब, अनिल गावकर, समीर लब्दे, अनुष्का गावकर, केदार परुळेकर, नम्रता महाकाळ, संजय हडपी, संदीप पारकर, लीलाधर मुणगेकर, रघुनाथ घागरे, रिया घागरे, जान्हवी घाडी, निलेश रेवडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page