पालक-विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन २० रोजी सकाळी ७ पासून आयोजन
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका बौद्ध सेवा समिती, मुंबई व मूलखी शाखा यांच्यावतीने विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. या उवक्रमांतर्गत लॉकडाऊन काळात अभ्यासाचे नियोजन या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान रविवार दि. २० जून रोजी सायंकाळी ७ वाजता गुगल मीट व युट्युब चॅनलवर प्रसारित होणार आहे. यामध्ये आर. पी. बागवे हायस्कुल मसुरेचे शिक्षक किशोर चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी https://youtu.be/JcN7gXf9uo0 या लिंकवर संपर्क साधावा या उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालक यांनी घ्यावा, असे आवाहन मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई व मूलखी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
