*शहरात प्रभाग ७ आणि ८ मध्ये नगरपालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट

४० जणांनी केली टेस्ट; एकही रुग्ण पोजिटीव्ह नाही*

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी शहरात प्रभाग वार करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक ७ आणि ८ साठी सालईवाडा , शिरोडा नाका येथील ज्येष्ठ नागरिक केंद्र येथे रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. या मध्ये दोन्ही प्रभागातील एकूण ४० नागरिकांनी आपली तपासणी केली असून, यामध्ये एकही पोजिटीव्ह रुग्ण सापडला नाही आहे. यावेळी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका सौ भारती मोरे, डॉ. उमेश मसुरकर, गजानन परब, सय्यद आदी नगरपालिका कर्मचारी तसेच शासकीय रुग्णालय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page