२१ जून नंतर लॉकडाऊन नको

दोडामार्ग व्यापारी संघाचे तहसीलदारांना निवेदन

*💫दोडामार्ग दि.१७-:* दोडामार्ग शहरातील सर्व व्यापरि वर्ग व संतोष नानचे यांनी 21 जून नंतर आम्हाला लॉकडाऊन नको आता लॉकडाऊन पुरे झाले आमची सहनशीलता आता संपली आम्ही लॉकडाऊन 21 तारिख नंतर आम्ही पाळणार नसल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी तहसीलदार यांना सांगितले. कोरोना टेस्ट दोडामार्ग गांधीचौक येथे नकरता ती दोडामार्ग गोवा चेक पोस्ट वर करा बाजारपेठेत टेस्ट केल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग कर्जबाजारी झाला आहे. आणि तुम्ही असे बाजारपेठेत टेस्टटिंग केले तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा व्यापाऱ्यांनी दोडामार्ग तहसीलदार यांना दिला. दोडामार्ग गांधीचौक येथे प्रशासन सकाळ पासून सायंकाळ पर्यंत बाजाराला येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करतात त्यामुळे त्याठिकाणी वेगळे वातावरण होते. त्यामुळे बाजारपेठेत लोक यायला बगत नाही. याचा फटका सर्व व्यापारी वर्गाला बसतो. त्यामुळे बाजारपेठेत कोरोना टेस्ट करण्यापलीकडे ती टेस्ट दोडामार्ग गोवा सीमेवर करा असे आवाहन व्यापाऱ्यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना केले. यावेळी व्यापारी संतोष नानचे, पांडुरंग बोर्डेकर,सागर शिरसाट, मोहन गवंडे, मींनार मणेरीकर, दादा करमळकर, रजत राणे, मंजुनाथ इलकल, श्रीधर रेडकर आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *तहसीललदार म्हणतात आम्हाला टार्गेट असत!* यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले आम्हाला दिवसाला कोरोना टेस्ट करण्याचे टार्गेट असत त्यामुळे बाजारपेठेत नागरिक भरपूर असतात म्हणून आम्ही बाजारपेटगेत कोरोना टेस्ट करतो . *कोरोना जास्त पसरण्यामागे* *शासन जबाबदार* :- **संतोष नानचे* “आजार आहे डोक्यात आणि तपासणी करतात घुडग्यात ” असं आरोग्य विभागाची गत झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापारी वर्गालाच शासन विसरले आहे. त्यांना परत लसीकरणासाठी प्राधान्य देणे गरजेचे होते मात्र या व्यापाऱ्यांची म्हणा किंवा लोकप्रतिनिधी, ग्राऊंडलेवर काम करणाऱ्या वर्गाचीच शासनाला विसर पडला आहे त्यामुळे हा कोरोना आजार सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला आहे. आता टेस्ट करण्यापेक्षा लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page