सक्रीय रुग्णांची संख्या २७० वर;जिल्हा शल्य चिकित्सक
*💫सिंधुदुर्गनगरी दि०५-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.