*कॅबिनेट मंजुरीनंतर याबाबाचे आदेश निर्गमित होतील, असे दिले आश्वासन*
*💫आंबोली दि.०५-:* सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आंबोली येथे राष्ट्रवादीचे नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये घरबांधणीची परवागनी पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींकडे देण्याच्या अनुषंगाने निवेदन देत चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायतींना अधिकार देण्याचे निश्चित झाले असून कॅबिनेटच्या मंजूरीनंतर याबाबतचे आदेश निर्गमित होतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे विलास गावकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, संदीप राणे, पुंडलिक दळवी, सुभाष सावंत, रझाक बटवाले, दिलीप वर्णे, अमित केतकर, विशाल पेडणेकर, अशोक पवार, उदय भोसले, व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनाने नोव्हेंबर २०१५ मध्ये घरबांधणीच्या परवागनीच्या निकषात बदल केले. या बदलांचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. नोव्हेंबर २०१५ नंतर या दोन जिल्ह्यांमध्ये घरबांधणीसाठी परवानगी घेताना महसुल यंत्रणेकडे सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांमुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत आला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात गावठाण क्षेत्र घोषीत नसल्याने या दोन जिल्ह्यात हि समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१५ नंतर बांधण्यात आलेली शेकडो घरे आजहि अनधिकृतच आहेत. यावर पर्याय म्हणून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात घरबांधणीसाठीची परवानगी पुर्वी प्रमाणे ग्रामपंचायतींकडे देण्यात यावी. तसेच २०१५ पासून बाधकाम झालेल्या घरांनाही नियमित करावे, अशा मागणीचे निवेदन अबिद नाईक यांनी मुश्रीफ यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेवेळी ग्रामपंचायतींना परवागनी देण्याबाबतचे निश्चित झाले आहे. कॅबिनेटच्या मंजूरीनंतर हि कार्यवाहि होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितल्याचे श्री नाईक यांनी सांगितले सांगितले.