हॉटेल उदघाटनासाठी त्यांचे आंबोलीत आगमन
*💫आंबोली दि.०५-:* आंबोली येथे राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले असता सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग-व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ त्यांचे देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिद नाईक, तालुका अध्यक्ष गवस, ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी रामा गावडे व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. हसन मुश्रीफ हे आंबोलीत संभाजी चव्हाण या कार्यकर्त्याच्या एका खाजगी हॉटेलच्या शुभारंभसाठी आले होते. या हॉटेलचे उदघाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. यावेळी पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले.