*तीन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील नदी नाले तुडुंब*
*💫कुडाळ दि.१४-:* कुडाळ तालुक्याला सोमवारी पावसाने झोडपून काढले. गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पाऊस पडत राहिल्यास तालुक्यातील अनेक नदी नाल्यांच्या किनारील गावात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात दि. 12 जुन ते 14 जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली होती. कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार नसला तरी दिवस रात्र पावसाची संततधार सुरुच होती. रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाने कुडाळ तालुक्याला झोडपून काढले. रात्रभर मुसळधार कोसळणार्या या मुसळधार पावसाने सोमवारी ही कुडाळ तालुक्याला झोडपून काढले. सतत पडणार्या पावसामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. तर तालुक्यातुन वाहणार्या कर्ली, भंगसाळ, निर्मला, बेल नदी तसेच नदी-नाल्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत होती. त्यामुळे सतत पाऊस सुरू राहील्यास या नद्यांच्या किनार्या लगतच्या गावात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तर चांगल्या प्रकारे पाऊस बरसत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. असून शेतीच्या प्रारंभीच्या कामाला वेग आला आहे.
