जयदीप बल्लाळ यांच्यामुळे अत्यवस्थ महिलेले मिळाले रक्त

देव्या सूर्याजी यांचा पाठपुरावा

*💫सावंतवाडी दि.१४-:* उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची तातडीने गरज होती. याबाबतची माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना मिळताच त्यांनी तातडीने रक्तदाता शोधून काढला होता. यावेळी संघटनेचे सदस्य जयदीप बल्लाळ यांनी दाणोली वरून सावंतवाडी येथे येत रक्तदान केले आहे. जागतिक रक्तदान दिनी केलेल्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी सबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्तदाते आणि देव्या सूर्याजी यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page