शहरात ११ तर ग्रामीणात ६०
*💫सावंतवाडी दि.१४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ७१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ६० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सबनीसवाडा २, आर जी एम १, भटवाडी १, गरड १, नवसरणी १, सालईवाडा ४, न्यू खासकिलवाडा १, तर ग्रामीण भागात तळवडे १२, नेमळे २, बिटी १, कोनापाल १, ओटवणे ११, कोलगाव २, माजगाव १, माडखोल १, चराठा १, सांगेली १, कलंबिस्त १०, बांदा ५, शेरले २, नेतर्डे ३, दांडेली १, सातोळी ३, केसरी ३ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५६५ रुग्ण सक्रिय आहेत.
