जी प अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती
*💫ओरोस दि.१४-:* जलशक्ती अभियानामध्ये अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी शोषखड्डा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानाला ३०जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदयस्थितीत कोरोना निर्बंधामुळे दळणवळण तसेच इतर बाबी बंद असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत कामे सुरू करून मजुरांना काम देणेबाबत सुचना केलेल्या आहेत. त्याकरिता जलशक्ती अभियानामध्ये घरोघरी शोषखड्डे तसेच पाणी स्तो्त्राचे गाळ काढणे तसेच पाणी पुर्न:भरणाची कामे घेण्याची असून सदरची कामे माहे-३० जून २०२१ अखेर पूर्ण करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.
