पाच हजार दंड किंवा १५ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा दया

मास्क न वापरणाऱ्यां विरोधात राजू मसूरकर यांची न्यायालयात याचिका

*💫सावंतवाडी दि.१४-:* जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्यावर दुर्लक्ष करून रुग्ण वाढीस कारणीभूत ठरणारे लोक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत मास्क न वापरता बिनधास्त वागणाऱ्या आणि प्रशासनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर पाच हजार रुपये दंड किंवा १५ दिवस तुरुंगवास देण्यात यावा अशी मागणी केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे असून, जनहित याचिकेद्वारे त्यावर नियम टाकण्यात यावे आणि वाढत्या रुग्णांवर आळा घालण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी राजू मसुरकर यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page