गाळामुळे पाणी शिरते वस्तीत नुकसान झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतर करण्याचा गोपाळ गवस यांचा इशारा
*💫दोडामार्ग दि.१३-:* तिलारी नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरते लोकांना घरातून पळ काढावा लागतो मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोखरण अंतर्गत तिलारी नदी काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नदी पात्रात गाळ काढण्याचे आदेश दिले होते. या नुसार गेल्या दोन महिन्यांपासून जलसंपदा विभाग यांत्रिकी विभाग यांची मशिनरी लावून गाळ काढण्याचे काम सुरू होते पण पाणी शिरलेल्या ठिकाणी गाळ काढला नाही. त्यामुळे पुराचे पाणी गावात शिरले तर गावातील ग्रामस्थ यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतर करू असा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिला आहे.
