काही काळ वाहतूक ठप्प; एकेरी वाहतूक सुरू*
*💫कणकवली दि.१३-:* दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण – नडगीवे घाटी येथे महामार्गावरच दरड कोसळली यामुळे सर्वत्र माती पसरून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर यामुळे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती. खारेपाटण पासूनजवळ असलेल्या नडगीवे घाटीत अतिवृष्टीमुळे आदीष्टी मंदिर पासून अगदीजवळ असलेली महामार्ग लगतची एक दरड कोसळली. या दरम्यान कोणतेही वाहन महामार्गावर नसल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. सदर घटना सार्वजनिक बांधकाम विभाग खारेपाटण कार्यलयाला समजताच मुंबई गोवा महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने मजुरांच्या मदतीने व जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेली दरड तातडीने हटविण्यात आली व महामार्गाची वाहतूक मोकळी करण्यात आली. मुसळधार पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास अजूनही काही ठिकाणचा दरडीचा भाग कोसळण्याची दाट शक्यता असून महामार्गाच्या बाजूने असलेले विद्युत पोल व लाईनला यामुळे धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने दरड कोसळण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नडगीवे घाटीत कायमस्वरूपी मजबुत संरक्षक भिंत बांधणे काळाची गरज आहे.
