तोक्ते चक्रीवादळातील शेतकरी, मच्छिमारांना तुटपुंजी मदत

मच्छीमारांही 5 लाखाचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने द्यावे:परशुराम उपरकर

*💫कणकवली दि.११-:* चक्रीवादळाचा बोटींचे व जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे मच्छीमारांना देखील ५ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे.अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केली असून शेतकऱ्यांच्या नारळ, पोफळी,आंबा,काजू बागांचे कोट्यावधीची हानी होऊन अत्यंत तुटपुंजी मदत सरकारने जाहीर करत तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. पालकमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत वजन नसल्याने मच्छिमारांवर अन्याय झाल्याचे ते म्हणाले. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयातून ऑनलाइन मनसे सरचिटणीस परशराम उपरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परशुराम उपरकर म्हणाले,कालच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना ३ लाखाचे कर्ज शुन्य टक्के दराने देण्याचे जाहीर केले. किनारपट्टीवर मच्छिमारांना पॅकेज दिले पाहिजे,ही मागणी पालकमंत्र्यांना करता आली नाही.समुद्रात मत्स्य संकट व बाहेर कोरोना निर्बंध आहेत.त्यामुळे आता तरी बिनव्याजी मच्छिमारांना ५ लाखांचे कर्ज देण्याची गरज आहे.पालकमंत्री हा प्रश्न मांडायला कमी पडले असल्याचा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला. पालकमंत्र्यांनी केंद्राकडे १४५० कोटीची मागणी केली. तर राज्याकडुन ४० कोटी देत हात आखडता घ्यायच्या हे चूकीचे आहे.तोक्ते वादळ नुकसानभरपाई पोटी मदत ठाकरे सरकारने जाहीर केली,त्यात मच्छिमारांना टॉलर्स बांधायला २८ लाख खर्च येताहेत.तर साध्या बोटींना ५ लाखांचा खर्च येतो, पण २५ हजार मदत एकप्रकारे केली जात आहे.मच्छिमारांची झाळी नुकसान मध्ये ५ हजार रुपये जाहीर केली,त्यात कोणता निकष लावला.देवगड, वेंगुर्ले मालवण नुकसान मोठे झाले आहे.शेतकऱ्यांना नारळ नुकसान ५० रुपये देता, रोप बाहेर २५० रुपये लागतात. नारळाच्या झाडाला २५० रुपये त्याची नुकसान हेक्टरी २५ हजार जाहीर करी फसवणूक केली,कारण नारळाचे झाड वर्षात ५ हजार उत्पन्न देत असतं,कलमाचा झाडाला ५०० रुपये मदत ही धूळफेक आहे. अद्याप नुकसानभरपाईचा शासन निर्णय नाही.शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही.पत्रे उडल्यानंतर घर उघडी आहेत.पालकमंत्री कमी वजन असल्याने मदत मिळत माही.शशनाने जाहिर केलेलं पॅकेज फसवं आहे.निसर्ग वादळाचे अद्याप मदत नाही.ही तरी नुकसान भरपाई गणपती पूर्वी मिळणार का?नसेल तर मनसे रस्त्यावर उतरले. रस्त्यावर खड्यांचे काम ६८ कोटी टेंडर झाले नाही,म्हणून वैभव नाईक अधिकाऱ्यांशी वाद करतात.आता गावागावात रस्ते खराब झाले आहेत.त्यांच्यासाठी भांडावे ,पालकमंत्री खासदार व आमदार हे अपयशी ठरले आहेत.रुग्णवाहिका देण्यावरुन वाद होतात,केवळ सत्ताधारी श्रेयवाद करत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

You cannot copy content of this page