*💫मालवण दि.०४-:* मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील प्रा. डॉ. सुमेधा सुदर्शन नाईक यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार 24 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता . महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या 85 मानकऱ्यांमध्ये डॉ. सुमेधा नाईक यांचा समावेश होता. कोरोनाच्या वातावरणामुळे पुरस्कार पोस्टाने पाठवण्यात आला होता. आज दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी , सन्मान चिन्ह , मानपत्र , गौरव पदक, मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र या स्वरूपातील हा राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. सुमेधा नाईक यांना कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील नरहरी झांट्ये सभागृहात कृ.सी. देसाई शिक्षण मंडळाच्या वेबसाईट उद्घाटनाच्या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये प्रा. सुमेधा नाईक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हयातील पर्यटन व्यवसायाचा कणा असणाऱ्या हॉटेल व्यवसायाच्या सेवा गुणवत्तेविषयी सादर केलेल्या संशोधनपर योगदानाची दखल घेवून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेकडून डॉ. सुमेधा नाईक यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. याप्रसंगी कृ.सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव श्री. चंद्रशेखर कुशे, श्री. साईनाथ चव्हाण, श्री. संदेश कोयंडे, श्री.प्रमोद ओरस्कर , डॉ. शशिकांत झांट्ये , श्री. सुधीर धुरी तसेच संस्थेचे इतर मान्यवर संचालक व सदस्य उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते. उपस्थित मंडळींनी डॉ. नाईक यांचे अभिनंदन केले. आपल्या मनोगतामध्ये डॉ.नाईक यांनी संस्थेचे , अध्यक्षांचे महाविदयालयाच्या प्राचार्यांचे व आपल्या कुटुंबाचे संशोधनास प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले. तसेच मनुष्यबळ विकास लोकसेवा संस्थेचे संस्थापक अॅडव्होकेट कृष्णाजी जगदाळे यांचेही आभार मानले मानले.
डॉ. सुमेधा नाईक यांना भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान…..
