निलक्रांती संस्था संस्थापक रविकिरण तोरसकर
मालवण (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता कोरोना विरुद्धच्या लढाईत नविन रणनिती वापरणे गरजेचे बनलेले आहे. यासाठीच डॉ. रेडकर रिसर्च सेंटर मालवणने शोधलेला मिथिलीन ब्ल्यु औषधांचा वापर कोरोनाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून प्रभावी असल्याच मत निलक्रांती संस्थेचे संस्थापक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले. मालवण येथील डॉ. रेडकर रिसर्च सेंटर मालवण व निलक्रांती सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत हडीच्या ग्रामदक्षता समितीचे सदस्यांचे प्रशिक्षण ग्रामपंचायत हडी याठिकाणी घेण्यात आले. त्यावेळी तोरस्कर हे बोलत होते याप्रसंगी ग्रामदक्षता समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सरपंच महेश बाळकृष्ण मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी रविकिरण तोरसकर यांनी कोरोनापूर्व, कोरोना झालेला असताना व कोरोना झाल्यानंतर घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आहार तज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी कोरोना रुग्णांसाठी आहार, कोरोना पश्चात घ्यावयाच्या आहार याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मिथिलिन ब्ल्यु या औषधाविषयी माहिती, त्याचा वापर वैद्यकिय सल्ल्याने घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत निसर्गोपचार तज्ञ नमिता चुरी यांनी सर्वांनी घ्यावयाची काळजी, प्राणायमचे महत्त्व व सतत सकारात्मक विचार करुन आनंदी राहण्याबाबत मार्गदर्शन केले. या बरोबरच डॉ. चेतन यांनी उपस्थित मेडिकल चेकअप केले.
