*💫सावंतवाडी दि.०७-:* मळेवाड येथील विलगीकरण कक्षासाठी बाळकृष्ण कुंभार यांच्याकडून वाफ घेण्यासाठी १५ मशीन सुपूर्द करण्यात आली आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या गाव विलगीकरण कक्षात सहा रुग्ण विलगीकरणात ठेवण्यात आले असून यासाठी दात्याकडून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली जात आहे. या कक्षातील रुग्णांना वाफ घेता यावी यासाठी कै महादेव (पोस्टमन) सिताराम कुंभार यांच्या स्मरणार्थ बाळकृष्ण (फुलाजी) महादेव कुंभार यांनी पंधरा वाफेची मशीन भेट दिली आहेत. तसेच गजानन शिरसाठ, दिलीप शिरसाठ, प्रकाश शिरसाट, सखाराम मोरुडकर, बाबली गवंडे, महालक्ष्मी स्टील सेंटर, मळेवाड यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे. या कक्षामध्ये जे रुग्ण राहत आहेत त्यांची चहा, नाष्ट्याची व्यवस्था पोष्टिक आहार साठी सुकामेवा याचा खर्च ग्रामपंचायत करत असून ज्या रुग्णांना घरून जेवण देणे शक्य नाही अशा रुग्णांना जेवणाची सोय ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहे. हा सर्व खर्च लोकसहभागातून केला जात असून दात्यांनी या कक्षासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच हेमंत मराठे यांनी केले आहे.
मळेवाड येथील विलगीकरण कक्षाला बाळकृष्ण कुंभार यांच्याकडून १५ मशीन सुपूर्द
