*प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त उपक्रम; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून राबवणार उपक्रम*
*💫सावंतवाडी दि.०४-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या 5 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका कॉंग्रेस आणि सावंतवाडी शहर कॉंग्रेस च्या वतीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजनाची सोय करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून शहरातील कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी ‘ कॉंग्रेस थाळी ‘ सुरू करण्यात येत आहे. लॉक डाऊन मुळे सर्व हॉटेल दुकाने बंद असल्याने अनेक गोर गरीब जनतेचे जेवणाचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
