*💫वेंगुर्ले दि.०४-:* वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील नुकसानग्रस्त पुॅमलास राॅबर्ट डिसोझा, सतीष हरीशचंद्र वेंगुर्लेकर, हेमलता हेमेंद्र केरकर, अतुल सुनील केरकर, रामदास चंद्रकांत हळदणकर, शाम साठे यांना नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते ताडपत्री वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जाॅन्सन आगोस्तीन डिसोझा इत्यादी उपस्थित होते. मोदी सरकारच्या दुसरया टर्मच्या दुसरया वर्षपुर्ती निमित्ताने भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सेवा सप्ताहात विविध सेवा कार्य हाती घेऊन जनमानसात भाजपा ची विचारधारा पोहचवीण्यात येत आहे. तसेच नरेंद्र मोदीजींनी गेल्या सात वर्षात घेतलेले न भूतो न भविष्यती असे निर्णय सर्वसामान्य जनतेला कळावे, हा यामागचा उद्देश आहे. भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सेवा सप्ताहाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम आयोजित करुन भाजपा ची प्रतिमा एक सेवाभावी पक्ष म्हणून समाजात रुजवली आहे. तौक्ते चक्रिवादळात नुकसान झालेल्या गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ठीक ठीकाणी मदत कार्य हाती घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम भाजपा च्या वतीने करण्यात येत आहे.
सेवा – सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील हाॅलीक्राॅस – साकववाडी येथील वादळग्रस्तांना ताडपत्र्यांचे वाटप…
