Headlines

रोटरी क्लब कुडाळकडून १० गुणवंत शिक्षकांचा गौरव

शिक्षक दिनाचे औचित्य

⚡कुडाळ ता.०८-: शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कुडाळ हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ सामंत यांनी, “शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान आहे,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्मिता सुरवसे, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर, इव्हेंट चेअरमन सचिन मदने, माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, रविंद्र परब, डॉ. संजय केसरे आदी उपस्थित होते.

पुरस्काराचे मानकरी :

सौ. नयना सावंत (अंगणवाडी सेविका, घावनळे-खुटवळवाडी), सौ. रुपाली चव्हाण (अंगणवाडी सेविका, मुळदे), श्री. लक्ष्मण आगलावे (प्राथमिक शिक्षक, पडतेवाडी शाळा, कुडाळ), श्री. अमोल गोसावी (प्राथमिक शिक्षक, नेरूर-गोवेरी), श्री. रुपेश कर्पे (सहाय्यक शिक्षक, पणदूर हायस्कूल), श्री. विद्यानंद पिळणकर (सहाय्यक शिक्षक, साळगाव हायस्कूल), सौ. सलोनी सावंत (उच्च माध्यमिक विभाग, पणदूर हायस्कूल), श्री. अजित व्हनमाने (उच्च माध्यमिक विभाग, कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज), सौ. देवयानी आंगचेकर (सहाय्यक प्राध्यापक, संत राऊळ महाराज महाविद्यालय) आणि श्री. एस. के. पवार (सहाय्यक प्राध्यापक, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ) यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक म्हणाले, “शिक्षक फक्त शिकवत नाहीत, तर ते पिढ्या घडवतात, स्वप्नांना दिशा देतात आणि राष्ट्राच्या भविष्याची पायाभरणी करतात.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इव्हेंट चेअरमन सचिन मदने यांनी केले, तर आभार रोटरी क्लबचे सचिव राकेश म्हाडदळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page