Headlines

एक दिवस माझ्या कुडाळासाठी’ उद्या शहरात भव्य स्वच्छता मोहीम…

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नागरिक व कार्यकर्त्यांना श्रमदानाचे आवाहन..

⚡कुडाळ ता.२८-: कुडाळ शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता ‘एक दिवस माझ्या कुडाळासाठी…’ या संकल्पनेतून भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ’ हा संदेश घेऊन ही मोहीम राज हॉटेलजवळील अंडरपास येथून सुरू होणार आहे.
शहरातील विविध रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसराची स्वच्छता करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, या उद्देशाने या श्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “कुडाळ हे आपले घर आहे आणि ते स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने या श्रमदानात आपला खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे.”
या स्वच्छता मोहिमेत शहरातील सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कुडाळच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page