पालिकेच्या नियोजन बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय:वाहतूक कोंडीसाठी पालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’तर ग्रामीण विक्रेत्यांसाठी नव्या भाजी मंडईच्या पार्किंगमध्ये व्यवस्था..
⚡सावंतवाडी ता,२७-:
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहराचा मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या मोती तलावाच्या परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे अशा प्रकारचा निर्णय आज पालिकेत झालेल्या नियोजन बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला तसेच शहरात ठरवून दिलेल्या सात ठिकाणीच आठ बाय दहा या आकाराचे बॅनर फक्त सात दिवसाची परवानगी घेऊन लावता येणार असल्याचे नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी सांगितले.
अनधिकृत बॅनरवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तर
मांडवी चे सामान विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील विक्रेत्यांना रस्त्यावर बसू न देता त्यांची सोय नव्या भाजी मंडईच्या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत केली जाणार असून वाहतूक कोंडीवर हा उपाय असेल असेही त्यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेतील नियोजनासंदर्भात बैठक नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. झालेल्या चर्चेमध्ये प्रामुख्याने शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडी वर प्रकर्षाने चर्चा झाली दोन दिवस बाजारपेठेमध्ये असणारी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातून येणाऱ्या विक्रेत्यांना यावेळी रस्त्यावर बसू न देता त्यांना नव्या भाजी मंडईच्या इमारतीच्या खालील पार्किंगच्या जागेत योग्य नियोजन करून बसवले जाणार असल्याचे नगराध्यक्ष सौ भोसले यांनी सांगितले. नव्या इमारतीच्या खालील पार्किंगची जागा भव्य असून त्या ठिकाणी 400 च्या आसपास विक्रेते बसू शकतात त्यामुळे त्या ठिकाणी तशा प्रकारची सोय केली जाणार आहे. भाजी विक्रेते डेकोरेशनचे वस्तू मांडवी च्या वस्तू तसेच अन्य विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था केली जाणार आहे त्या ठिकाणी लाईट व सीसीटीव्ही फुटेजही बसवले जाणार आहे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी एसटी विभागाकडून एसटी बसेस नगरपालिके मार्गे सोडण्यास देण्यात यावे अशी मागणी केली दरवर्षी एसटी बसेस शहराबाहेरून गेल्याने एसटीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसतो असे सांगितले तर ज्यादा एसटी बसेस च्या पार्किंगसाठी जिमखाना परिसराच्या एका बाजूला जागा उपलब्ध करून देण्याची विनंती ही त्यांनी केली. यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून नगराध्यक्ष सौ भोसले यांनी माहिती घेतली असता वाहतूक पोलीस श्री पिळणकर म्हणाले, नगरपालिके मार्गे एसटी बसेस येण्यास काही हरकत नाही परंतु एकापाठोपाठ एक बस सोडण्यात येऊ नये एकाच वेळी एक किंवा दोन बस आल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो त्यावर उपाययोजना केल्यास हा प्रश्न निर्माण होणार नाही याशिवाय गणेश चतुर्थी सणाच्या काळात मालवाहतूक गाड्या ट्रान्सपोर्ट गाड्या व दूध वितरणाच्या गाड्या अवेळी येतात त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवतो अशा गाड्यांना ठराविक वेळ दिल्यास वाहतूक कोंडी टाळता येऊ शकते असे सांगितले. यावर तोडगा काढत एसटी बसेस नगरपालिका मार्गच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान शहरात फूटपटचे काम सुरू असल्याने ठीक ठिकाणी बांधकाम साहित्य पडलेले आहे यामुळे वाहतूक कोंडी उद्भवू शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला यावर सदरचे काम येत्या 30 तारीख पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेल्या आहेत असे नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी सांगितले. दुसरीकडे शहराच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक पार्किंग संदर्भात सूचनाफलक लावण्यात येणार आहे त्यानुसार प्रत्येक वाहनधारकांनी पार्किंग व्यवस्थेमध्ये आपली गाडी पार्क करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
गणेश चतुर्थी सन हा आनंदाचा आणि उत्साहाचा असल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी वीज कर्मचारी जास्त तैनात करण्याची मागणी यावेळी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केली यावेळी वीज अधिकाऱ्यांकडून जास्त कर्मचारी ताईंना ठेवण्याची ग्वाही देण्यात आली तसेच कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून फोन न उचलण्यासारखा प्रकार घडल्या आपल्याला संपर्क साधावा असे विनंती सहाय्यक अभियंता विणा मटकर यांनी केली. यावर संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल नंबर नागरिकांसाठी उपलब्ध करून द्या असे सूचना मुख्याधिकारी श्री औंधकर यांनी केली.
