Headlines

मोती तलावात आज नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीफळ अर्पण…

सावंतवाडी संस्थान व पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी संस्थान आणि सावंतवाडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावामध्ये श्रीफळ (नारळ) अर्पण करण्याचा पारंपरिक कार्यक्रम आज, गुरुवारी (दि. २७) आयोजित करण्यात आला आहे.

नारळी पौर्णिमेनिमित्त तलावाच्या काठावर हा पारंपरिक व सांस्कृतिक सोहळा होणार असून, आज दुपारी ४.३० वाजता मोती तलाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
या कार्यक्रमास सावंतवाडीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page