वैभववाडी प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. साईकृपा अपंग संस्था आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग आणि रमा विष्णू ग्राफिक्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
दिव्यांग युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी मिळाव्यात, तसेच त्यांना विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध आस्थापना व कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होऊन दिव्यांग उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व कौशल्य लक्षात घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, मुलाखत प्रक्रिया आणि इतर आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईकृपा अपंग संस्था व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा रोजगार व नोकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच मिळणार आहे. याची नोंद घ्यावी.
स्थळ: पंचायत समिती सभागृह,कुडाळ
वेळ : १०.००
दिनांक: १ सप्टेंबर २०२६
अधिक माहितीसाठी संपर्क.
जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर 9765979450/ 9623655142/9322073992
