⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी येथील श्रीमती दिपाली दिलीप भालेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या विविध कागदपत्रांच्या साक्षांकनाच्या कामासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ ४ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑगस्ट २०३१ असा पाच वर्षांचा राहणार आहे.
याबाबतचे नियुक्ती प्रमाणपत्र सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
दिपाली भालेकर यांच्या नियुक्तीबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून नागरिकांना साक्षांकनाच्या कामासाठी सुलभ व वेळेवर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
